ओढ

हिरव्या डोंगरांची
पांढर्या धबधब्यांची...
आंब्याच्या सावलीची
काजुच्या बियांची!
ओढ....

लाल गढूळ पाण्याची
गुर्हाळ्यातल्या रसाची
गोठ्यातल्या गाईची
खळखळत्या हश्याची!
ओढ...

बागेतल्या शहाळ्याची
सोलांच्या कढीची
नाश्त्यात मऊभाताची
आंब्याच्या अढीची
ओढ...

'ऐसपैस डब्या'ची
जोरदार भांडणांची
क्षणात झालेल्या युतीची
हिरकुटाच्या बाणाची
ओढ...

'रामरक्षे'च्या प्रसादाची
देव्हार्यातल्या दिव्याची
उंच उंच झोक्याची
दूर जाण्याऱ्या थव्याची
ओढ...

पत्ते अन् नव्या व्यापाराची
मऊशार गोधडीची
माडीवरच्या चिंचांची
लपवलेल्या पोतडीची!
ओढ...

कोल्हा-करकोच्याच्या गोष्टीची
विहिरीच्या रहाटाची
तुळशीच्या अंगणाची
पाहुण्यांच्या चर्हाटाची
ओढ...

सोडता सोडवत नाही...
तोडता तोडवत नाही...
मोडता मोडवत नाही...
आजोळची... ओढ!

टिप्पण्या

Fiadon म्हणाले…
Daaappppooooollllliiiiiiiiiiiiiiiiii..... great madam!
Rajan Mahajan म्हणाले…
हिरकुटाच्या बाणाची.....he vachun kityek varsh visaralelya khelachi parat athavan zali. hirakutacha dhanushya ani baan banavun chikhalat, kata - kuti khelane ha pavasalyatala favorite khel hota.
Thanks !!

evadhya sarva goshti tula athavatat, lakshat rahatat.....dhanya aahe tuzi.
Purnima म्हणाले…
Tks for ur comments at food post, glad it sounded helpful..Tumhi faar surekh lihita! Sundar olya aahet! Take care, Ketaki!
अनामित म्हणाले…
very nice..liked it :)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...