पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आनंदवन

अचानक एखादी सकाळ              सूर्यकिरण सोनेरी आणते आणि आप्तेष्टांच्या हश्यानी              घर फुलून जातं ! चहाच्या झुरक्यात जुन्या आठवणींना             उजाळा मिळतो वाफेच्या तालावर           यमन राग तरळतो... सहज सुलभ गप्पानी चेहरे खुलतात येत्या शनिवारचे प्लान ठरतात गेल्या रविवारचे किस्से चालतात ... मुलं बागडतात , घराचं मैदान होतं, घराला आनंदवनाचं रूप प्रदान होतं ... चिवड्याच्या चवीनी चेष्टांना रंगत येते  उटण्याच्या सुवासाने देवघर धुंद होते  फटाक्यांचे खोके माळ्यावरून डोकावतात  अचरट, पसरट तरीही हलके, विनोद सोकावतात  नव्या कपड्यांची परीटघडी               जुन्या सोन-कुड्यांनी सजते  आरश्यातल्या प्रतिबिंबानी               नवी नवरी लाजते  अचानक एखादी सकाळ              सूर्यकिरण ...

शांततेचा आवाज

इमेज
कामाचा जड दगड मनावरून उचलावा ... दगडाखालच्या नाजूक विचारांना वाहू द्याव... एक छोटीशी अत्तराची कुपी बरोबर असावी ... एखादी संध्याकाळ अशीही असावी... मन मर्जी तिथे चालत रहावं … चित्ररूप तळ्याच्या काठी जावं आणि हलकेच चित्राचा भाग होऊन जावं  शांततेचा आवाज ऐकावा  एखादी संध्याकाळ अशीही असावी ... बाजूच्या बाकावर बसलेल्याच्या मनाचा थांग घ्यावा...  सळसळत्या पानांचा पिवळा रंग पापण्यात भरून घ्यावा  शरद ऋतू अनुभवावा  एखादी संध्याकाळ अशीही असावी ... Credit @Sam दूर दिसणाऱ्या लाटांना खो देउन परत यावं… उडणाऱ्या केसांना उडू द्यावं .. न बोलता संवाद साधावा  एखादी संध्याकाळ अशीही असावी ... नावेतून डोलत मावळत्या सूर्याचा निरोप घ्यावा ...  हेलकावे घेणाऱ्या पाण्याला डोळ्यांनीच स्पर्श करावा ...  एखादी संध्याकाळ अशीही असावी ... मनमोकळं हसावं,  आवडती गाणी गावीत ...  उगवत्या चंद्राला मोकळ्या मनानी आकाशाच्या कवेत घ्यावं ...  एखादी संध्याकाळ अशीही असावी ...

प्रेमाचा शब्द

प्रेम हा शब्द खूप बोजड आहे... आपलं नातं नाजूक आहे, त्याला तो झेपण्यासारखा नाही... मैत्री तर आहेच पण... त्याही पेक्षा जास्त असलेलं नातं असेल तर? आपल्यासाठी आपण एक नवीन शब्द तयार करू ... माझ्यातल एक आणि तुझ्यातल एक अक्षर जोडून बघू टिकतं का... मी शब्द गुंफायला सुरुवात करते , तू पूर्ण करशील?

डोळे

तू चेहरा लपवत जा तुझा, मला भेटायला येतोस तेव्हा... तोंडाने चेष्टा मस्करी करत असलास, तरी तुझ्या घाऱ्या डोळ्यांनी तुला नेहमी दगा दिलाय! ते माझ्या कानात हळूच सांगतात, तुला काय म्हणायचं असतं ते... तुझ्या दोन वाक्यांमधला क्षण त्यांना पुरतो, तुझं गुपित उघड पाडायला... सहज म्हणून हसतोस तेव्हा तुझे डोळे किती घबऱ्या हरणासारखे पळत असतात... माझ्या डोळ्यात तुझी जागा शोधत असतात....!

मैं हूँ|

तुम्हारी गुदगुदी वाली हसी सुनना चाहती हूँ... तुम्हारे भोलेपनको हाथो में  सिमटना चाहती हूँ... तुम्हारे बचपनके हर पलकों मैं भी जीना चाहती हूँ... मैं ठीक हूँ...! नई उम्मीदोंको जगाना चाहती हूँ... नए रास्ते खोजना चाहती हूँ... नए मंजिलोंपर पोहोचना चाहती हूँ... मैं खुश हूँ...! नई चीज़ोको आजमाना चाहती हूँ... परदेसकी गलियोंमें देश ढूंढ़ना चाहती हूँ... दोस्तों के मेलेमें खोना चाहती हूँ... मैं ज़िंदा हूँ...!  मैं तुमसे दूर हूँ... मैं सीख रही हूँ... मैं काबिल हूँ... मैं माँ, पत्नी, बेटी, दोस्त हूँ...| मैं हूँ|

आलिया भोगासी

दिवसाशेवटी लॅपटॉप समोरूनी पूर्ण कामे करुनि केला आदर ।। मनी केला विचार संपवुनी ढीगभर कामाचा डोंगर खेळावे क्षणभर ... ।। गुलाबी हातांनी मिचमिच्या डोळ्यांनी इटुकल्या ओठांचा कबीर हजर ! मोठे कुतूहल तोंडी किलबिल छोट्याश्या डोळ्यांनी पहातसे ।। सरबत्ती प्रश्नांची मालिका गप्पांची लॅपटॉपला तो निरखतसे ।। झोपला कुशीत घेतला मिठीत मुका घेऊन गेला स्वप्नांच्या गावात ।। त्याला झोपवून लॅपटॉप घेऊन उघडले दुकान... पुन्हा एकवार ।। प्रेमळ साथीदार लावी कामाला हातभार त्याच्या कृपेवर माझे दुकान चाले ।। आलिया भोगासी असावे सादर मनी काही शंका आणू नये ।। करावे कर्म निभावावे प्रेम आनंदाचे मर्म हेच का?!