आनंदवन
अचानक एखादी सकाळ
सूर्यकिरण सोनेरी आणते
आणि आप्तेष्टांच्या हश्यानी
घर फुलून जातं !
चहाच्या झुरक्यात जुन्या आठवणींना
उजाळा मिळतो
वाफेच्या तालावर
यमन राग तरळतो...
सहज सुलभ गप्पानी चेहरे खुलतात
येत्या शनिवारचे प्लान ठरतात
गेल्या रविवारचे किस्से चालतात ...
मुलं बागडतात , घराचं मैदान होतं,
घराला आनंदवनाचं रूप प्रदान होतं ...
सूर्यकिरण सोनेरी आणते
आणि आप्तेष्टांच्या हश्यानी
घर फुलून जातं !
चहाच्या झुरक्यात जुन्या आठवणींना
उजाळा मिळतो
वाफेच्या तालावर
यमन राग तरळतो...
सहज सुलभ गप्पानी चेहरे खुलतात
येत्या शनिवारचे प्लान ठरतात
गेल्या रविवारचे किस्से चालतात ...
मुलं बागडतात , घराचं मैदान होतं,
घराला आनंदवनाचं रूप प्रदान होतं ...
चिवड्याच्या चवीनी चेष्टांना रंगत येते
उटण्याच्या सुवासाने देवघर धुंद होते
फटाक्यांचे खोके माळ्यावरून डोकावतात
अचरट, पसरट तरीही हलके, विनोद सोकावतात
नव्या कपड्यांची परीटघडी
जुन्या सोन-कुड्यांनी सजते
आरश्यातल्या प्रतिबिंबानी
नवी नवरी लाजते
अचानक एखादी सकाळ
सूर्यकिरण सोनेरी आणते
आपल्या माणसांना घेऊन
दिवाळीची चाहूल लागते ...!
टिप्पण्या