शांततेचा आवाज


कामाचा जड दगड मनावरून उचलावा ...
दगडाखालच्या नाजूक विचारांना वाहू द्याव...
एक छोटीशी अत्तराची कुपी बरोबर असावी ...
एखादी संध्याकाळ अशीही असावी...

मन मर्जी तिथे चालत रहावं …
चित्ररूप तळ्याच्या काठी जावं आणि हलकेच चित्राचा भाग होऊन जावं 
शांततेचा आवाज ऐकावा 
एखादी संध्याकाळ अशीही असावी ...

बाजूच्या बाकावर बसलेल्याच्या मनाचा थांग घ्यावा... 
सळसळत्या पानांचा पिवळा रंग पापण्यात भरून घ्यावा 
शरद ऋतू अनुभवावा 
एखादी संध्याकाळ अशीही असावी ...

Credit @Sam


दूर दिसणाऱ्या लाटांना खो देउन परत यावं…
उडणाऱ्या केसांना उडू द्यावं .. न बोलता संवाद साधावा 
एखादी संध्याकाळ अशीही असावी ...

नावेतून डोलत मावळत्या सूर्याचा निरोप घ्यावा ... 
हेलकावे घेणाऱ्या पाण्याला डोळ्यांनीच स्पर्श करावा ... 
एखादी संध्याकाळ अशीही असावी ...

मनमोकळं हसावं, 
आवडती गाणी गावीत ... 
उगवत्या चंद्राला मोकळ्या मनानी आकाशाच्या कवेत घ्यावं ... 
एखादी संध्याकाळ अशीही असावी ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2