पोस्ट्स

नोकरी

पुस्तकांच्या गर्दीतून पहाटेच्या सर्दीतून बस पकडली थेट आज 'Campus Placement'! formal pant हवी इस्त्रीचा shirt हवा बुटाला polish हवं tie ही जरा stylish हवा.. ‘final’ चा अभ्यास रग्गड उरला आहे पण सध्यातरी नोकरीचाच ज्वर चढला आहे गणपतीला नमन विठ्ठलाला वंदन ‘इकडे’ मात्र तटस्थ उभे सुटाबुटातले सात जण एकेकाचं नाव येतं फडश्या पडतो सार्यांचा tension ने अंत नसतो बाथरूम च्या ‘वार्यां'चा नाव पुकारलं जाताच माझं पोटात येतो गोळा ‘coference room’ चं दार उघडतं चेहरा पडतो काळा एक round दोन rounds गणती काही थांबत नाही एकेक गडी बाद होतो गळतीही थोपत नाही ‘Tell me about yourself’ समोरचा साहेब विचारतो अचानक डोळ्यासमोर एक मोठ्ठा तारा चमकतो! थांबलेल्यांचे उसासे आणि टांगत्या तलवारी खाली मान दिवसाशेवटी उरतात मोजकेच काही भाग्यवान … … … … पहाटे कधीतरी दार हळूच उघडून येतो… बूटही न काढता आपण थकून झोपी जातो काळजी करणारे ‘ते’ दोघं उठवायला म्हणून येतात आणि देवांसमोरचे पेढे बघून हरखून हरखून जातात!

"click"

हार फुलांचा गळ्यात माळू चल आपण दोघे, थोडे लाजून थोडे हासून हातही हाती घे. "click" मंदिरातल्या देवा नमुनी भव्य कमानी ये, खांद्यावरचा पदर धरुनी हासून मी पाहे "click" बोटीमधुनी, विमानातुनी, फिरुनी चल येऊ, कारंजे वा बागेमध्ये 'असे' उभे राहू "click" अवघडलेपण गेले आता खांद्यावरती हात, डोळ्यामधले हासू सांगे ' हीच कायमची साथ' "click" तुझे कुटुंब माझे होवो, माझे मीपण सारुनी जावो, भेटी ऐशा कैक होवो, क्षणन् क्षण कैद होवो... "click ...click...click" मोठे आपण झालो आता पिकू लागले केस, ओलांडून मी सहजची आले ही 'साठी' ची वेस वाढदिवस, सण-सोहळे, झाले हे साजरे, मुले आपली परदेशाची झाली आता लेकरे... नातू आणि नातीचा चेहरा पाहिला आज, दोघेही ल्याली होती 'halloween ' चा साज जाणीव झाली... जाणीव झाली उजाडला तो दिवस आज शेवटी, या पिढीची त्या पिढीशी व्हायला हवी भेटी ठाऊक त्यांना असेल काय आजी आजोबांबद्दल? संसाराच्या पसार्याचे प्रेम हेच मुद्दल? याच दिवसासाठी केले "click " कैक फोटो, क...

|| पाठीराखा ||

'त्या'ची वाट पहाया शिकवले मला पण तोच माझी वाट पहात होता || पायी पंढरी मी निघाले जायाला, पण 'तो' वाटेवरल्या पाणपोईत होता || हिमशिखरावर ओंकार मी शोधे, पण तो शाळेतल्या पाटीवर होता || औदुंबराशी प्रदक्षिणा घातल्या, दत्त म्हणून 'तो' उंबरठ्याशी उभा || आरत्या शेजारत्या सार्या 'त्या'साठी, धूप दीप उदबत्ती ही लावली, इतक्यातच 'तो' कानगोष्ट सांगे, "भिऊ नको मी पाठीशी आहे उभा" ||

आता कुठे...!

आहेरातल्या 'Dinner sets' नी माळ्याचा कोपरा गाठलाय, 'माझ्या' रोजच्या वस्तूंनी नव्या कपाटाचा कप्पा साठलाय, साखरपुड्याच्या साडीनं पुन्हा एकदा बाहेरचं जग पाहिलंय, आता कुठे आडनाव माझं तेंडोलकर व्हायला लागलंय! आठ महिने झालेही असतील सात फेरे घेऊन, पण अजूनही कुणी विचारलं की घरचा पत्ता?- 'मुलुंड'! हळुहळू नवं जग मला ओळखीचं वाटायला लागलंय... आता कुठे आडनाव माझं तेंडोलकर व्हायला लागलंय! passport चं शेवटचं पान आता ओळखपत्र म्हणून चालत नाही! जुन्या दोस्तानी 'कुठे असतेस?' विचारल्यावर "घरी!" म्हणून चालत नाही! पण 'चांगल्या' चहाची नवी definition आता लक्ष्यात ठेवायला जमल्ये- आता कुठे आडनाव माझं तेंडोलकर व्हायला लागलंय! मोजून दोन माणसं मला 'तेंडोलकर madam' म्हणतात, बाकी सगळे अजूनही 'आठवले junior समजतात! दोन्ही ओळखीनं 'ओ' द्यायला मन आता तयार झालंय, आता कुठे आडनाव माझं तेंडोलकर व्हायला लागलंय! fast dial च्या numbers चं page बदलायला काढलंय, कारण काळजीवाहू सरकारचं पारडं डझनावारी वाढलंय.. ५०-एक नव्या म्हणींची माझ्या शब्द...

राहणार चेन्नई...

एक होतं जोडपं,कामाच्या पाई मु.पो.मुंबई पण राहणार चेन्नई... चेन्नईचं नाव ऐकून लोक चक्राऊन जातात पार, कपाळावर आठ्या पाडून प्रश्नांचा भडीमार, "जेवता कसे? राहता कसे? कमाल आहे बाई!" मु.पो.मुंबई पण राहणार चेन्नई! अरे देवा, रस्सम भात खाता आणि हाणता इडली डोसा? त्यात आणखीन मरणाचा उकाडा ही सोसा! आपली भाषाही नाही! मग परत यावंसं वाटत नाही? हं... मु.पो. मुंबई पण राहणार चेन्नई! हसून त्या जोड्प्यानी असे कैक प्रश्न झेलले, नवी आव्हानं नवे बदल, अगदी सहज पेलले, म्हणाली ती दोघं- "गुपित सांगतो आग्रहा पाई, मु.पो. मुंबई पण राहणार चेन्नई!" "आवडीच्या विषयात काम करायला आलो, स्वतःच्या पायावर उभं राहायला आलो, परक्या जमिनीवरही जिद्दीनं पुढे जायला आलो, समजुतीनी खर्या अर्थानी एक व्हायला आलो!" घराच्या उंबरठ्यातच त्यांचा सारा शीण जाई... मु.पो.मुंबई आणि राहणार चेन्नई :)

ओढ

हिरव्या डोंगरांची पांढर्या धबधब्यांची... आंब्याच्या सावलीची काजुच्या बियांची! ओढ.... लाल गढूळ पाण्याची गुर्हाळ्यातल्या रसाची गोठ्यातल्या गाईची खळखळत्या हश्याची! ओढ... बागेतल्या शहाळ्याची सोलांच्या कढीची नाश्त्यात मऊभाताची आंब्याच्या अढीची ओढ... 'ऐसपैस डब्या'ची जोरदार भांडणांची क्षणात झालेल्या युतीची हिरकुटाच्या बाणाची ओढ... 'रामरक्षे'च्या प्रसादाची देव्हार्यातल्या दिव्याची उंच उंच झोक्याची दूर जाण्याऱ्या थव्याची ओढ... पत्ते अन् नव्या व्यापाराची मऊशार गोधडीची माडीवरच्या चिंचांची लपवलेल्या पोतडीची! ओढ... कोल्हा-करकोच्याच्या गोष्टीची विहिरीच्या रहाटाची तुळशीच्या अंगणाची पाहुण्यांच्या चर्हाटाची ओढ... सोडता सोडवत नाही... तोडता तोडवत नाही... मोडता मोडवत नाही... आजोळची... ओढ!

वेस

इमेज
उगवत्या सूर्याला मी लालबुंद होताना पाहिलंय... उजाडताना पाहिलंय, प्रकाशताना पाहिलंय! पण गावच्या वेशीवर आज मन अस्वस्थ होऊन राहिलंय... लुकलुकत्या डोळ्यांनी माझं घर उध्वस्त होताना पाहिलंय... A Tribute To All Those Who Suffered in Japan Tsunami & Earthuake ... 11 March 11.