पोस्ट्स

संक्रांतीचा पतंग

कणी बांधा रे बांधा रे कणी बांधा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! माध्यान्हीचा सूर्य जर खाली सरू दे, गुळपोळीचा स्वाद जिभेवर असू दे, मांजाच्या रीळाला भरधाव सोडा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! लख्ख लख्ख सारं नीळं आभाळ असू दे, सूर्यास्ताला अजूनही तास असू दे, वार्र्याची मर्जी वेगाने जोखा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! एकीकडे खिडकीमध्ये 'चिंगी' असू दे, नजरेच्या कोपर्यातून 'बंड्या' बघू दे, बघता-बघता पतंगाने उसळी मारू दे! उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! समोरच्या गच्चीबरोबर काटाकुटी चालू दे, वार्र्याच्या तालावर पतंग डोलू दे, कधी जबर खेचाखेच तर कधी थोडी ढील दे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! कधी गट्टी कधी कट्टी चाले पतंगाचा खेळ, भिन्न-भिन्न रंगाचा आकाशात मेळ, घराच्या दोन भिंतींतून बाहेर पडा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! पतंगाची उंची भारी, रेखाटली दिशा सारी, नजर वर वर करा, उत्साहाने डोळे भरा! क्षणासाठी सार्र्या चिंता विसर जरा रे! उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे!!

Vision 2013

पी-पी पो-पो करणार्यातला एक गाडीवान तरी हल्ली विचार करायला लागलाय गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...|| थुंकणार्या- पिंकणार्या हजार तोंडामधला एक पान सोडायला लागलाय प्लास्टिकचे पाउस पाडणार्या इन्द्रामधला एक त्याला 'घाण' म्हणायला लागलाय भाजीवाल्याची पिशवी दिसता एक तरी जण 'नको'ची मान हलवायला लागलाय गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...|| झोपड्यांना पाहून नाकं मुरडणार्यातला तिथेच शाळा भरवायला लागलाय त्याच गटारावरच्या शाळेमधला एक जण IAS चा फॉर्म भरायला लागलाय नेत्यांची ओळख दाखवणार्या हजारातला एक 'लाचखोरी'ला नकार द्यायला लागलाय गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...|| मदतीचे हात मुंबईत कायमच होते... नेहमीच नांदते मुंबईत उत्साहाचे भरते... पण नव्या युगाच्या नव्या मतांचा प्रकाश आता आकाशात भरून राहिलाय गंजणार्या मुंबईच्या एका कोपर्यातून आता सूर्य दिसायला लागलाय...!

उपास मज लागला...

उपास मज लागला गडयांनो उपास मज लागला! विठूरायाची एकादशी, गणरायाची संकष्टी, असला-तसाला नाही माझा उपास बहु कष्टी! करूनच दाखवण्याचा निश्चय आज मनी साठला, उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला! एकच इच्छा आहे माझी 'आय-फोन' एक मिळावा, कॉलेजच्या कट्ट्यावर माझा उदो-उदो व्हावा! पालकांनीही दिली मंजुरी, एकच 'पण' घातला! उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला! पिताश्रींनी केली गर्जना, संगणकी नेले, "फेसबुक एकादशी"त्याचे नामकरण केले! संगणकाचा स्पर्शही वर्ज या दशदिनी उपवासाला, उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला! उपास माझा अलग असे सोपा तर अजिबात नसे! जो जो म्हणतो "सहज करीन", तो तो या ते जरूर फासे, विचार त्याचा करुनी केवळ कंठ आज दाटला उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला! डोके भिर-भिर फिरू लागले, हात सारखा पुढे सारे, हळूच संधी घेऊन टाकू, एकाच इच्चा मनी उरे! कधी नव्हे तो या इच्छांचा अंत आज गाठला उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला! दहावा दिवस आज असे... चार तासांची मुदत दिसे, संगणकाशी आमने-सामने.. घरातही कोणीच नसे! पडलो बळी मी अखेर अश्या मोह...

| गोडगाळणी |

चांगली माणसं, मोहक क्षण, आवडती जागा, स्वच्छ मन, सगळं सगळं गाळून फक्त हाच गाळ ठेवणारी 'गोडगाळणी' देईल का कुणी आणून? शाळेच्या बेंच वर उभं राहून कान धरले तेव्हा बाजूच्या बेंचवर उभी राहणारी ती, कॉलेजच्या कट्ट्यावर रडत बसले तेव्हा 'मलाही इंग्लिश येत नाही' असं म्हणणारी ती... यांना पुन्हा एकदा बिलगायचं म्हणून, 'गोडगाळणी' देईल का कुणी आणून? वाढदिवसाच्या दिवशी ओवाळणारी आजी, नोकरीचं पाहिलं प्रोमोशन मिळालं तेव्हा चॉकलेट देणाऱ्या काकू, त्याच क्षणी परत जाऊन त्यांना मिठी माराय्च्ये म्हणून, गोडगाळणी' देईल का कुणी आणून? वरळी सी-फेस वर गुलाब घ्यायला लाजला होतास तेव्हाचा उशीर झाला म्हणून स्वतः पोळ्या केल्या होतास तेव्हाचा तो क्षण मुठीत घट्ट धरून तेवायचं म्हणून 'गोडगाळणी' देईल का कुणी आणून? पहिल्यांदा ‘त्या’च्या घरात पाऊल ठेवलं तेव्हा पहिल्या विमान प्रवासात ढगांचं राज्य पाहिलं तेव्हा चेहर्यावरचं ते हसू पुन्हा अनुभवायचं म्हणून 'गोडगाळणी' देईल का कुणी आणून? क्षण असे अनेक आहेत… आणि माणसांचीही यादी अमर्याद... पण एखादा दिवस असा असतो...जे...

अडचण

अडचणी येतात, ओरखडे ओढतात... त्याबद्दल माझं मत फारसं परखड नाही, पण, अडचणींना सामोरं जाणं तसं अवघड नाही... नदीच्या लोंढ्याउलट तग धरता आलं, आणि डोळे वटारून अरे ला कारे करता आलं, की लक्ष्यात येतं, परीक्षेचा हा पेपर तसा बोजड नाही, अडचणींना सामोरं जाणं तसं अवघड नाही... हो ना! आता पर्यंत तुझ्या एवढं आभाळ कुणावर कोसळलं नसेल! तुझं तेवढं कठीण आणि त्यांचं सोपंही असेल! पण तुला वाटतं तितकाही ओझं तुझं जड नाही.. अडचणींना सामोरं जाणं तसं अवघड नाही... आई, बाबा, भाऊ, बहीण, सखी किवा सखा... तू फक्त उभं राहायचं ठरव, तयार होईल पाठीराखा! प्रश्नाची उकल आपोआप उमलून दे... तुला समजून घेणार्याला तू ही समजून घे! पाठीराख्याची पकड अशी घट्ट करून घे, अडचणीची मानगूट धर आणि दूर भिरकावून दे! लागलंच तर बडबड कर, तुही थोडी धडपड कर, मग एकच टोला लगाव आणि चांगली अटकेपार कर! म्हणजे तीच अडचण येण्याची पुन्हा भानगड नाही... अडचणींना सामोरं जाणं तसं अवघड नाही!

वेळ

हरणाच्या वेगानं रान पालथं घालणारा... सिंहाच्या डरकाळीनी 'आ' वासून उभा राहणारा... भित्र्या सश्याच्या डोळ्यात दिसणारा... घड्याळाच्या काट्याला 'आवाज' बहाल करणारा... कॉफीच्या कपसह भुर्रकन् उडून जाणारा... मावळत्या सूर्यासह समुद्रात बुडून जाणारा... मिणमिणत्या पणतीच्या ज्योतीत भासणारा... रुईच्या कापसासारखा अलगद दिसणारा... कधी स्तब्ध पाचोळ्यासारखा गप्प बसलेला... कधी उंच झोक्यानी उर भरून आलेला... क्षणांचे प्रहर, प्रहरांचे दिवस, दिवसांची तपं करणारा... आधी रडवून भिजवणारा... आणि मग खिदळून हसवणारा... वेळ...

हितगूज

खांद्याची कमान कर नखशिखांत भीज... मग गोधडीची उब घेऊन दुमडून जरा नीज.. आठवणींच्या ओलाव्यात बीजासारखी रूज... कोवळ्या पालवीनी कर पावसाशी हितगूज...!