आईचं घर

मनाच्या मर्जीप्रमाणे रंगणारं
हलक्या हवेवर तारांगणारं

जुनासा फ्लॉवर पॉट , साधीशी नक्षी त्यावर
आईचं घर |

ठरलेली गोधडीची घडी , ठरलेला सोफ्याचा angle
ठरलेला सूर्यप्रकाश, ठरलेला मोकळं अंगण

वाळत पडल्या कपड्यांची त्यात भर
आईचं घर |

मनमोकळ्या गप्पा आणि गरम पोळीचा घास
कोथिंबीर घालून केलेल्या आमटीचा वास...

काही हवंय हे कळायच्या आधीच आई ते घेऊन हजर
आईचं घर |

छोट्याश्या वळणाची ठरलेली गल्ली
कोपऱ्यातलं दुकान जरा बदललंय हल्ली

आज आहे उद्या नसेल तर?
आईचं घर |

कशाला इतका त्रास सारखा पुढे जायचा ध्यास
दे थोडा अल्पविराम , मनाला तेवढाच आराम
एक काम कर
आईच्या घराचा रास्ता धर
ओंजळीत भरून घे मायची सर
माझ्या आईचं घर |

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...