आलिया भोगासी

दिवसाशेवटी
लॅपटॉप समोरूनी
पूर्ण कामे करुनि
केला आदर ।।
मनी केला विचार
संपवुनी ढीगभर
कामाचा डोंगर
खेळावे क्षणभर ... ।।
गुलाबी हातांनी
मिचमिच्या डोळ्यांनी
इटुकल्या ओठांचा
कबीर हजर !
मोठे कुतूहल
तोंडी किलबिल
छोट्याश्या डोळ्यांनी
पहातसे ।।
सरबत्ती प्रश्नांची
मालिका गप्पांची
लॅपटॉपला तो
निरखतसे ।।
झोपला कुशीत
घेतला मिठीत
मुका घेऊन
गेला स्वप्नांच्या गावात ।।
त्याला झोपवून
लॅपटॉप घेऊन
उघडले दुकान...
पुन्हा एकवार ।।
प्रेमळ साथीदार
लावी कामाला हातभार
त्याच्या कृपेवर
माझे दुकान चाले ।।
आलिया भोगासी
असावे सादर
मनी काही शंका
आणू नये ।।
करावे कर्म
निभावावे प्रेम
आनंदाचे मर्म
हेच का?!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...