पोस्ट्स

कूस

इमेज
 

किती दूर जाशील...

इमेज

बाकी काही नाही पण...

इमेज

उन्हाची ऊब

इमेज

प्राजक्त

इमेज

बाबा

इमेज

झेप

इमेज

बासरी

इमेज

खजिना

अजुन पाऊस आठवतो तो... ओल्या पानांची ती सळसळ... अजुन वारा गातो गाणे, भूतकाळाची भासे तळमळ आठवते रे खुदकन हसणे मित्र म्हणून तू हासवलेले आठवते का बघ ते गाणे प्रियकर म्हणुनी पाठवलेले बघ आठवती किती आर्जवे केली होती भेटायची भेटून तरीही राहून गेली गोष्ट नेमकी बोलायाची अजुन आठवती ते डोळे निरोप घेता पाणवलेले अजुन गाडी शिटी देतसे परत भेटीचे शब्द दिलेले... आठवतो ग गजरा हलका दोन बटांच्या मध्ये साधला ... उपास तुझा म्हणूनच माझा ... घास भरवुनि सोडूनि दिधला .... बघ आठवतो प्रवास अपुला एका छत्रीतुन केलेला ना बोललीस तू शब्द एकही तरीही कळवल्यास भावना किनाऱ्याहूनी न्यहाळलेला चंद्र आठवे अजुन तो सरणारी ती वाळू असो वा हातांमधले हात असो... नाती गोती मैत्रीचा, दागिनाच जणुकी दडला.. आठवणीच्या कोनाड्यातून खजिना मजला सापडला... खजिना मजला सापडला...

पर्जन्य प्रार्थना

ये रे पावसा पावसा आता अंत नको पाहू तुझ्या पायाशी लोटांगणेही माथा ही टेकवू । येशी आकाशाच्या मार्गे विधात्याचे रूप घेशी कष्ट साचलेत फार आता माझ्या मायदेशी | लोक भुकेले तहाने डोइ छप्परही नाही त्यांच्या आसवांना लपायाला समयही नाही | मोठा गनीम बलाढ्य आता मृत्यू हेच सत्य .... असा कडाडून ये तू भेद अदृश्य हे युद्ध | अरे पावसा पावसा तुझा माफीचा स्वभाव माणसाची चूकभूल पोटी घाल दया दाव | थेंबाथेंबातून तुझ्या तुझी माया बरसुदे शून्यातून पुन्हा उभा आज माणूस राहू दे | धरतीची मी लेक केतकी साकडं घालते कधी येशील रे आता  तुझी वाट मी पाहते | अरे पावसा पावसा  अवतरशील धर्तीवर  तुझ्या कृपेवर आम्ही  उभे जोडुनिया कर... जोडुनिया कर ...| 

आनंदवन

अचानक एखादी सकाळ              सूर्यकिरण सोनेरी आणते आणि आप्तेष्टांच्या हश्यानी              घर फुलून जातं ! चहाच्या झुरक्यात जुन्या आठवणींना             उजाळा मिळतो वाफेच्या तालावर           यमन राग तरळतो... सहज सुलभ गप्पानी चेहरे खुलतात येत्या शनिवारचे प्लान ठरतात गेल्या रविवारचे किस्से चालतात ... मुलं बागडतात , घराचं मैदान होतं, घराला आनंदवनाचं रूप प्रदान होतं ... चिवड्याच्या चवीनी चेष्टांना रंगत येते  उटण्याच्या सुवासाने देवघर धुंद होते  फटाक्यांचे खोके माळ्यावरून डोकावतात  अचरट, पसरट तरीही हलके, विनोद सोकावतात  नव्या कपड्यांची परीटघडी               जुन्या सोन-कुड्यांनी सजते  आरश्यातल्या प्रतिबिंबानी               नवी नवरी लाजते  अचानक एखादी सकाळ              सूर्यकिरण ...

शांततेचा आवाज

इमेज
कामाचा जड दगड मनावरून उचलावा ... दगडाखालच्या नाजूक विचारांना वाहू द्याव... एक छोटीशी अत्तराची कुपी बरोबर असावी ... एखादी संध्याकाळ अशीही असावी... मन मर्जी तिथे चालत रहावं … चित्ररूप तळ्याच्या काठी जावं आणि हलकेच चित्राचा भाग होऊन जावं  शांततेचा आवाज ऐकावा  एखादी संध्याकाळ अशीही असावी ... बाजूच्या बाकावर बसलेल्याच्या मनाचा थांग घ्यावा...  सळसळत्या पानांचा पिवळा रंग पापण्यात भरून घ्यावा  शरद ऋतू अनुभवावा  एखादी संध्याकाळ अशीही असावी ... Credit @Sam दूर दिसणाऱ्या लाटांना खो देउन परत यावं… उडणाऱ्या केसांना उडू द्यावं .. न बोलता संवाद साधावा  एखादी संध्याकाळ अशीही असावी ... नावेतून डोलत मावळत्या सूर्याचा निरोप घ्यावा ...  हेलकावे घेणाऱ्या पाण्याला डोळ्यांनीच स्पर्श करावा ...  एखादी संध्याकाळ अशीही असावी ... मनमोकळं हसावं,  आवडती गाणी गावीत ...  उगवत्या चंद्राला मोकळ्या मनानी आकाशाच्या कवेत घ्यावं ...  एखादी संध्याकाळ अशीही असावी ...

प्रेमाचा शब्द

प्रेम हा शब्द खूप बोजड आहे... आपलं नातं नाजूक आहे, त्याला तो झेपण्यासारखा नाही... मैत्री तर आहेच पण... त्याही पेक्षा जास्त असलेलं नातं असेल तर? आपल्यासाठी आपण एक नवीन शब्द तयार करू ... माझ्यातल एक आणि तुझ्यातल एक अक्षर जोडून बघू टिकतं का... मी शब्द गुंफायला सुरुवात करते , तू पूर्ण करशील?

डोळे

तू चेहरा लपवत जा तुझा, मला भेटायला येतोस तेव्हा... तोंडाने चेष्टा मस्करी करत असलास, तरी तुझ्या घाऱ्या डोळ्यांनी तुला नेहमी दगा दिलाय! ते माझ्या कानात हळूच सांगतात, तुला काय म्हणायचं असतं ते... तुझ्या दोन वाक्यांमधला क्षण त्यांना पुरतो, तुझं गुपित उघड पाडायला... सहज म्हणून हसतोस तेव्हा तुझे डोळे किती घबऱ्या हरणासारखे पळत असतात... माझ्या डोळ्यात तुझी जागा शोधत असतात....!

मैं हूँ|

तुम्हारी गुदगुदी वाली हसी सुनना चाहती हूँ... तुम्हारे भोलेपनको हाथो में  सिमटना चाहती हूँ... तुम्हारे बचपनके हर पलकों मैं भी जीना चाहती हूँ... मैं ठीक हूँ...! नई उम्मीदोंको जगाना चाहती हूँ... नए रास्ते खोजना चाहती हूँ... नए मंजिलोंपर पोहोचना चाहती हूँ... मैं खुश हूँ...! नई चीज़ोको आजमाना चाहती हूँ... परदेसकी गलियोंमें देश ढूंढ़ना चाहती हूँ... दोस्तों के मेलेमें खोना चाहती हूँ... मैं ज़िंदा हूँ...!  मैं तुमसे दूर हूँ... मैं सीख रही हूँ... मैं काबिल हूँ... मैं माँ, पत्नी, बेटी, दोस्त हूँ...| मैं हूँ|

आलिया भोगासी

दिवसाशेवटी लॅपटॉप समोरूनी पूर्ण कामे करुनि केला आदर ।। मनी केला विचार संपवुनी ढीगभर कामाचा डोंगर खेळावे क्षणभर ... ।। गुलाबी हातांनी मिचमिच्या डोळ्यांनी इटुकल्या ओठांचा कबीर हजर ! मोठे कुतूहल तोंडी किलबिल छोट्याश्या डोळ्यांनी पहातसे ।। सरबत्ती प्रश्नांची मालिका गप्पांची लॅपटॉपला तो निरखतसे ।। झोपला कुशीत घेतला मिठीत मुका घेऊन गेला स्वप्नांच्या गावात ।। त्याला झोपवून लॅपटॉप घेऊन उघडले दुकान... पुन्हा एकवार ।। प्रेमळ साथीदार लावी कामाला हातभार त्याच्या कृपेवर माझे दुकान चाले ।। आलिया भोगासी असावे सादर मनी काही शंका आणू नये ।। करावे कर्म निभावावे प्रेम आनंदाचे मर्म हेच का?!

सवयीची जागा

सवयीचा झाला आहे आता । विमानाचा चमचमता आकाशातला दिवा क्षितीजाच्या पलिकडचा जांभळा काळोख हवा हवा फक्त स्वतःचं ऐकणारा, न बोलणारा तास कैक मैल जाऊनही स्थैर्याचा भास सवयीचा झाला आहे आता । गोड बोलणारी आत्मविश्वासु हवाई सुंदरी पडद्या पलीकडची धून कुठलीशी अधमुरी नेहमीच्या सवयीने आरामात चढणारे पाच जण नजरेत न सामावणारं विमानतळाचं मोकळेपण सवयीचं झालं आहे आता । एकाच साच्यातले शोभेचे 'तिरामिसु' ग्राउंड स्टाफचं ओळखीचं हसु हक्कानं मिळवलेलं 'aisle' सीटचं अढळपद रंगीत पेयांची आणि खाद्याची रसद सवयीची झाली आहे आता । नेहमीची बॅग, नेणाऱ्या सामानाची मनातली यादी चार्जर, चाव्या, पाकीट, कपडे आणि निरुपयोगी मानेची गादी छोटासा 'मुका', गालांवर खास, जाण्याची हुरहूर, येण्याची आस, सवयीची झाली आहे आता । घरातलं घरपण... ऑफिसचं थोरलेपण... यांच्यातला दुवा म्हणजे आकाशातला प्रवास ! प्रवासात मिळालेली ध्रुवताऱ्याची जागा सवयीची झाली आहे आता ।

बेरीज-वजाबाकी

शोधून तुझा चेहरा मी आरशात पाहिला... पण माझाही चेहरा मला सापडला नाही ... दिवस होते मंतरलेले ऊब होती हवेत बाहेर कोसळता पाऊस आणि मी तुझ्या कवेत ... आल्याचा चहा तुझ्या हातचा खास होता, प्रेमाच्या बेरजेवर साथीचा 'हातचा' बास होता ... वेडे होतो आपण, एकमेकांत साखळी सारखे अडकलेले, डोळ्यातले भाव वर वर चढत गेलेले... कुठे गेला मधला काळ? कसे काढले आपण दिवस? खुश होतो बहुतेक, फेडलेही काही नवस! शोधून पाहिला चेहरा मी आरशात आज तुझा आरशानी मात्र दाखवला चेहरा माझा ... बदलेली मी , सुंदर प्रतिबिंब ... पण मग डोळ्यातले ते भाव का होते वजा? - केतकी

शिवरायांचे वीर

इमेज
Two students at the base of Lohagad fort...

तू नकोस जाऊ दूर...

तू नकोस जाऊ दूर ओढुनी रेषा आपल्यात, मी माझ्या बाजू, खूप आठवणी हळूच जपल्यात... इतक्या सहजीने मोडलास तू खेळ आपला का? मी हरायलाही तयार तरीही डाव संपला का? तू सरळ ओळीचा नाकासमोर चाल चालणारा, मी नागमोडीच्या वळणांमध्ये ध्यास लावणारी... तू धीट कसा इतका करामती समजेना मजला... तळहातावरती जीव तरीही कळेचना तुजला... नशिबाच्या नशिबानेच आपली भेट भेदुनी गेली... सांगु तरी रे काय?... हृदयास छेदूनि गेली... तू तुझ्याच आयुष्यात मग्न हो आशीर्वाद तुला, पण नको करू रे दूर असे इतक्यातच बाद मला...