मैत्री -1

मैत्री हा शब्द जरी घीसा पीटा वाटला
प्रत्येकाला तो वेगळा वेगळा पटला

मैत्री म्हणजे ह्यांव असते
मैत्री म्हणजे त्यांव असते
कविता कैक झाल्या तरी
मैत्री वेगळाच भाव असते

एकच भेट मग पुरून अगदी उरते
परत भेटेपर्यंत भेट पुन्हा पुन्हा स्मरते

वर्षानुवर्षं भेटत असलं जरी कुणी
म्हणतो आपण बघून त्याला 'असेल कुणीतरी!'

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...