अल्बम 2
हा किलबिलाट त्या पक्षांचा
रात्रभर प्रवास करून एका वळणावर
आपण अनुभवलेल्या त्या सुर्योदयाच्या ...
हा घोंघावणारा वारा आठवतो ?
आपण गोव्याच्या beach वर
समुद्राकडे टक लावून बसलो होतो तेव्हाचा ...
हा वास त्या करपलेल्या भांड्याचा,
त बर्याच दिवसांनी घरी आलास
तेव्हा नकळत उतू गेलेल्या कॉफीचा...
हा सुगंध त्या पहिल्या सकाळचा...
जेव्हा काश्मीरच्या कुशीत आपल्याला
जाग आली होती ...
हा सुवास त्या चाफ्याचा ,
जेव्हा बागेतल्या चाफ्याला पहिलं फूल
आलं होतं...
फोटोचे आल्बम असतात
घटनांचे व्हिडियो असतात ...
पण...
टिप्पण्या