चिनाराचं पान1
किती वर्षं झाली बरं?
असाच एकांत होता?
आजीनं विचारलं आजोबाना
शिकार्यात बसता बसता
दल लेकच्या पाण्यामधे
आजीनं पाहिलं हळूच
पदर धरला तोंडावरती
जणू लाजे लाजाळूच
माझ्यासाठी वेळ तुम्ही
कधीच नाही काढला...
म्हणता म्हणता असं
तिचा लटका राग वाढला
फिरता फिरता लेकमधून
दिसले चार चिनार
आजोबांच्या चेहर्यावर होती
हास्याची किनार
आता आजोबा बोलू लागले
घेउन घोट काव्याचा
"आता वेळ तुझाच आहे"
जणू सुर पाव्याचा
टिप्पण्या