कोडॅक मोमेंट!
लग्नाचा हॉल, माणसांची संख्या,
फुलं, माळा आणि अक्षता अक्ख्या!
मँचिंगचे ब्लाउस, साडीला बिडिंग...
पत्रिकेचा मजकूर.. हँपी वेडिंग!
आमंत्रणं, सजावट, इमेल की फोन?
देण्याघेण्याच्या पिशव्या आणि मेंदीचे कोन!
आलं, मिरच्या कोथिंबीर फ्लॉवर...
दुध दही लोणी आणि साखर !
मामा, मामी, मामीचा भाऊ,
भावाचे मित्र, मित्राची जाऊ!
घराला रंग, सोफ्याला कव्हर,
बिल्डींगच्या गेटलाही लग्नाचा फ्लेवर...
केटरिंग डेकोरेशन double checking!
हनिमून पॅकेज आणि advance booking!
ग्रहमक, पिवळी साडी...बहिणीचा मान,
अन्नपूर्णा देवी आणि उखाण्याचं पान...
जाताना गाडीसाठी गुलाबाचा हार ,
VIP ची बॅग आणि सामानाचा भार
मेकअप, हेअरस्टाईल checklist च्या घड्या,
इस्त्रीचे कपडे मुंडावळ्यानच्या लड्या!
पायधूणं, रांगोळी आरतीचं तबक...
दाराला तोरण मनात धकधक...
मुहूर्त... अंतरपाट... मंगलाष्टकं,
कावेरी नर्मदा..सावधान ... लोकं!
जेवणं, reception ...
एखादी छबुक कॉमेंट!
पाठवणी आणि हूरहूर...
कोडॅक मोमेंट!
टिप्पण्या
~Ashwini
baryach diwasat changli kavita vachali nahi...
ka te aaj kalala ka te...
tu lihilich navatis na!!