अल्बम 1

ह्या पावसाच्या धारांचा स्पर्श घे
बस स्टॉप वर थांबलेली मी
आणि धावत भिजत आलेला तू ...


आणि हा वास , त्या झकास तड्क्याचा

भिजत भिजत खाल्लेल्या गरम

पावभाजीचा ...




हा आवाज माझ्या खळखळून हसण्याचा...

तुझ्या वेड्या विनोदांना सुधा भरभरून दाद दिल्याचा ...




आणि हा दरवळलेला सुगंध त्या perfume चा,

तुझं मला दिलेलं पहिलं gift!




ही वार्याची झुळुक आठवते ?

त्या कोकणकड्यावर चढून गेल्यावर

विजयी मुद्रेने आपण उभे राहिलो तेव्हाची ...




कसा विसरीन मी हा वास ?

त्या चंदनाचा,

आपण पहिल्यांदा एकत्र ज्या मंदिरात

गेलो तिथल्या गाभार्यातला...


टिप्पण्या

arclite म्हणाले…
hmmmmmm...thats work of beauty
arclite म्हणाले…
kada chadhlyavar varyachi zuluk...i can feel the rewarding gesture that zuluk might have made

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...