पहिला पाऊस आणि पहिलं पोस्ट

एकच इच्छा अन् एकच ध्यास
चिंब भिजावं पाऊस पाण्यात

अंधुक दिसणारे ओले डोंगर
वाहत्या नद्यांवर पावसाची सर
हिरवी पालवीही प्रत्येक मनात
चिंब भिजावं पाऊस पाण्यात

हिरवटल्या शेतांचे वरते पाट
करड्या ढगांची दुरदुर लाट
टप्पोरा थेंब पड़े दाण्या दाण्यात
चिंब भिजावं पाऊस पाण्यात

शहरातले रस्ते गाड्या अन् घोडे
झाले खुश तरी बावरले थोड़े
वाहतूक थांबली मुम्बई पुण्यात
चिंब भिजावं पाऊस पान्यात

गरम भजी अन खिड़कीतली जागा
किशोरी अमोणकरच्या सुराचा धागा
प्यावा कटिंग तोही एक आनयत
चिंब भिजावं पाऊस पान्यात









टिप्पण्या

Phoebus म्हणाले…
अच्छा है, अच्छा है|
Prasad Vaidya म्हणाले…
masha alya masha alya
kharokharach masha alya
paus ala paus ala
sangat sangat masha alya
tuza blog wachun
stuti karavishi watali
mhanun gelo mashalla
ani kharoharach masha alya.

by the way, i have got a blog of my own. i dont update it very much but plz check out. fabulousprasad.blogspot.com
रोहन... म्हणाले…
रोज काहीतरी नवीन वाचावे या हेतूने नवीन-नवीन ब्लॉग शोधत असतो. कुठलाही ब्लॉग नवीनच वाचायला घेतला की त्या ब्लॉगच्या पाहिल्या पोष्टवर जाउन प्रतिक्रिया द्यायची ही आपली स्टाइल... :D

तेंव्हा अगदी २ वर्षा जुन्या पहील्यावहिल्या पोष्टवर प्रतिक्रिया आल्याचे पाहून दचकू नका.. आता संपूर्ण वाचायचा आहे तुमचा ब्लॉग.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...