पोस्ट्स

अडचण

अडचणी येतात, ओरखडे ओढतात... त्याबद्दल माझं मत फारसं परखड नाही, पण, अडचणींना सामोरं जाणं तसं अवघड नाही... नदीच्या लोंढ्याउलट तग धरता आलं, आणि डोळे वटारून अरे ला कारे करता आलं, की लक्ष्यात येतं, परीक्षेचा हा पेपर तसा बोजड नाही, अडचणींना सामोरं जाणं तसं अवघड नाही... हो ना! आता पर्यंत तुझ्या एवढं आभाळ कुणावर कोसळलं नसेल! तुझं तेवढं कठीण आणि त्यांचं सोपंही असेल! पण तुला वाटतं तितकाही ओझं तुझं जड नाही.. अडचणींना सामोरं जाणं तसं अवघड नाही... आई, बाबा, भाऊ, बहीण, सखी किवा सखा... तू फक्त उभं राहायचं ठरव, तयार होईल पाठीराखा! प्रश्नाची उकल आपोआप उमलून दे... तुला समजून घेणार्याला तू ही समजून घे! पाठीराख्याची पकड अशी घट्ट करून घे, अडचणीची मानगूट धर आणि दूर भिरकावून दे! लागलंच तर बडबड कर, तुही थोडी धडपड कर, मग एकच टोला लगाव आणि चांगली अटकेपार कर! म्हणजे तीच अडचण येण्याची पुन्हा भानगड नाही... अडचणींना सामोरं जाणं तसं अवघड नाही!

वेळ

हरणाच्या वेगानं रान पालथं घालणारा... सिंहाच्या डरकाळीनी 'आ' वासून उभा राहणारा... भित्र्या सश्याच्या डोळ्यात दिसणारा... घड्याळाच्या काट्याला 'आवाज' बहाल करणारा... कॉफीच्या कपसह भुर्रकन् उडून जाणारा... मावळत्या सूर्यासह समुद्रात बुडून जाणारा... मिणमिणत्या पणतीच्या ज्योतीत भासणारा... रुईच्या कापसासारखा अलगद दिसणारा... कधी स्तब्ध पाचोळ्यासारखा गप्प बसलेला... कधी उंच झोक्यानी उर भरून आलेला... क्षणांचे प्रहर, प्रहरांचे दिवस, दिवसांची तपं करणारा... आधी रडवून भिजवणारा... आणि मग खिदळून हसवणारा... वेळ...

हितगूज

खांद्याची कमान कर नखशिखांत भीज... मग गोधडीची उब घेऊन दुमडून जरा नीज.. आठवणींच्या ओलाव्यात बीजासारखी रूज... कोवळ्या पालवीनी कर पावसाशी हितगूज...!

खात्री

आलास आलास म्हणतोस.. पण भेट तुझी अजून घडली नव्हती… तुझ्या येण्याची बातमी ऐकली तरी खात्री अजून पटली नव्हती... खातरजमा करायला दुसर्या माध्यमाची नाही गरज… खिडकीतून डोकावले की फक्त मुसळधार अंगावर बरस!

गृहप्रवेश

इमेज
नव्या घरातलं पहिलं पाऊल...देवावरचं पहिलं फुल... कानातले सोन्याचे डूल...ओट्यावरची नवी चूल... उतू जाणारं दुध.. ओसंडणारा आनंद... आठवणींचा मृत्गंध...उदबत्तीचा सुगंध... खिडकीतली कोकिळा... हिरवीगार बाग... हिवाळ्याच्या पहाटे.. दूर कुठे जाग.. समुद्राच्या काठावर लाटांचा फेस पहिला गृहप्रवेश... पहिली ओलांडलेली वेस...

दोघी

एकीला ध्यास सुरांचा एकाला भावतो वारा... दोघांची ओढ मला सारखी... ती ही आहे जवळची.. तो ही आहे प्यारा.. दोघांचा स्वभाव सारखा, तरीही आहे न्यारा... पावसाच्या सरी आणि तानपुऱ्याच्या तारा...

Life is beautiful

There are days when you are sad and then there are days when you are just happy... A simple pure state of happiness… Everything around you seems to be working well… Not extra-ordinary... but just nice... Normal… The day is just right – not too sunny not but not too gloomy… You wake up just on time to get ready, do your prayers, looking in the mirror you think – I manage to look nice today :)… You walk out to go to office… The news-paper stand has the newspaper you want… he smiles as usual, you smile back… you see some more smiling faces… you don’t need to know their names… but you know they live here somewhere… the sense of familiarity makes you feel good :)… you manage to catch the bus you want…you have enough change for the bus ticket, get a place to sit and reach office on time.. 9.30 dot…. Then there are phone calls, emails… some stressed, some meaningless, some hard to answer, some easy … but then eventually you go about doing your job… Taking the last sip of coffee just befor...