गृहप्रवेश
नव्या घरातलं पहिलं पाऊल...देवावरचं पहिलं फुल...
कानातले सोन्याचे डूल...ओट्यावरची नवी चूल...
उतू जाणारं दुध.. ओसंडणारा आनंद...
आठवणींचा मृत्गंध...उदबत्तीचा सुगंध...
खिडकीतली कोकिळा... हिरवीगार बाग...
हिवाळ्याच्या पहाटे.. दूर कुठे जाग..
समुद्राच्या काठावर लाटांचा फेस
पहिला गृहप्रवेश... पहिली ओलांडलेली वेस...

कानातले सोन्याचे डूल...ओट्यावरची नवी चूल...
उतू जाणारं दुध.. ओसंडणारा आनंद...
आठवणींचा मृत्गंध...उदबत्तीचा सुगंध...
खिडकीतली कोकिळा... हिरवीगार बाग...
हिवाळ्याच्या पहाटे.. दूर कुठे जाग..
समुद्राच्या काठावर लाटांचा फेस
पहिला गृहप्रवेश... पहिली ओलांडलेली वेस...

टिप्पण्या