मनधरणी

पावसा पावसा लवकर ये,
आकाशाला झाकोळून टाक...
रस्त्यावरती धाव घे,
हाकेला आमच्या पाव रे!

लाहीलाही अंगाची...
उन्हाच्या लाल रंगाची...
उकाडा पार परतून दे
हाकेला आमच्या पाव रे!

दर्यातून ये खोऱ्यातून ये
हिरव्यागार फांद्यातून ये
हलक्याश्या झऱ्यातून ये
नाचेल सारं गाव रे
हाकेला आमच्या पाव रे!

लहानांना आनंद दे
शेतकऱ्याला धंदा दे
लहान असो व थोर असो
चिंब भिजायची हाव रे
हाकेला आमच्या पाव रे!

मे महिन्याचा भस्मासुर,
कोरडं निर्जन दूरदूर...
काळ्या ढगांचा लपंडाव,
मनाला लावी हूरहूर...
वाऱ्याच्या झोतातून ये!
हाकेला आमच्या पाव रे!

तुझी ओढ नेहमीचीच...
आळवणी माझी तीच तीच...
दरवर्षीची मनधरणी
मागे लागते तरीही मीच...
इस बार तो जल्दी आव रे
हाकेला आमच्या पाव रे!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...