वीज म्हणाली पावसाला....
जरा थांब जरा थांब
तुझी झेप लांब लांब
पागोळ्यांनी ओले खांब
तुझी वाट तरी सांग...
आळविते मी मल्हार
तुझी जीत माझी हार
अरे झेपे कसा भार
अंग शहार शहार
एक वेडा जणू नाद
मोरपंखी घाली साद
तूच पुढे कर हात
मिळे तुला माझी दाद
तुझा मेघ-निळा रंग
कधी नागमोडी ढंग
अरे तल्लीन होऊन
पाहायचा लागे छंद
माझा जीव तू आधा!
वेडी झाले रे नाथा..
तू कृष्ण मी राधा!
तू कृष्ण मी राधा!
तुझी झेप लांब लांब
पागोळ्यांनी ओले खांब
तुझी वाट तरी सांग...
आळविते मी मल्हार
तुझी जीत माझी हार
अरे झेपे कसा भार
अंग शहार शहार
एक वेडा जणू नाद
मोरपंखी घाली साद
तूच पुढे कर हात
मिळे तुला माझी दाद
तुझा मेघ-निळा रंग
कधी नागमोडी ढंग
अरे तल्लीन होऊन
पाहायचा लागे छंद
माझा जीव तू आधा!
वेडी झाले रे नाथा..
तू कृष्ण मी राधा!
तू कृष्ण मी राधा!
टिप्पण्या