प्रेरणा

कविता सुचते कशी?
झाडावरून कैरी पडते अगदी तशी!
विचारांना वेच जरा,
मग हात फिरतो गरागरा!

उत्साह भरतो असा मनात,
कागद हवा-हवा क्षणात!
शाई ही थोडी भरा,
हात फिरतो गरागरा!

दिसेल ते वाटे सुंदर!
फावल्या वेळेची त्यात भर...
श्वास घेऊ दे जराजरा,
हात फिरतो गरागरा!

ओसाड असतो काही वेळ,
शब्दांचा जुळे ना मेळ...
राग येतो तरातरा!
हात फिरतो गरागरा!!

एक घटना एक क्षण...
आठवणींचे चोरटे कण...
ओंजळिनी भराभरा
हात फिरतो गरागरा!

कविता सुचण्याचे भाव...
"प्रेरणा" त्याचं नाव,
विरळा पण तो क्षण खरा,
हात फिरतो गरागरा!

टिप्पण्या

Prasad Vaidya म्हणाले…
khupach chann!!!


tuzhya kavitewar maza ek atishay buddhu abhipraay -

sagle julun ale pan
have ketki che man
shabdan shabda khara khara..
haat firato garagara!!

(adhich sangitala hota ki buddhu abhipraay ahe teva vaitagu naka!)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...