तिनं फुलत्या झाडासारखा 'तिचा संसार सजवणं, माझ्या बायकोला सवाशीण म्हणुन सोळा सोमवारी बोलवणं! 'छान आहेत त्या!'- अशी 'हिची ' अजब अन्योक्ती, माझी 'हं ...' ची भाषा , उगाच पोकळ दर्पोक्ती! अचानक मग रस्त्यात तिनं पाठीमागून मारलेली हाक, आजही...तिच्या आवाजाला तिच धार, मी , खुळा, अवाक! वाटा कधी वेगळ्याही झाल्या , काळाच्या ओघात ... पण आठवणींची साठवण राहिली , हळुवार, दोघात! आजही तिची आठवण येते ...ती येत नाही... पण केस पिकलेत आताशा मी तेवढसं मनावर घेत नाही !