अर्धी लस्सी -3
शेवटची ओळ कवितेची...
'क्षण तुझे इतके गोड, की त्यातच मला थांबायचंय
आवडलास तू मला, हेच खरं खरं सांगायचंय'
खरं आहे का हे ? विश्वास त्याचा बसेना
चिमटा पहावा काढून पण तेहि त्याला सुचेना ...
ती हसली लाजुन , पण अगदी मनापासून
आवडलास तू मला , सांगितलं होतं तिनं ठासून ...
दोघांची नजरानजर आणि आनंदाला नाही पारावार
वाटलं दोघे मिळून कुठेही होऊन जावं पसार...
टिप्पण्या