अपेक्षा कौतुकाची 1
आई आई म्हणून जेव्हा पाऊलं ती टाकतात
टप्पोर्र्या मोठ्या डोळ्यांनी आपल्याकडे पाहतात
'शाब्बास बाळा-छान' या शब्दांची प्रतिक्षा
इवले इवले हात फक्त कौतुकाची अपेक्षा ...
मोठ्या डोळ्यात मोठी स्वप्न मोठ्यांच्याही आशा
हरवत जाते कुठेतरी पण शब्दांपलिकडची भाषा
तरीही वाटतं प्रयत्न करावे , रुंदावावी कक्षा
मिळवावे मोठ्यांचे आशीर्वाद अन फक्त कौतुकाची अपेक्षा ...
टिप्पण्या