आठवण -3
तिनं फुलत्या झाडासारखा 'तिचा संसार सजवणं,
माझ्या बायकोला सवाशीण म्हणुन सोळा सोमवारी बोलवणं!
'छान आहेत त्या!'- अशी 'हिची ' अजब अन्योक्ती,
माझी 'हं ...' ची भाषा , उगाच पोकळ दर्पोक्ती!
अचानक मग रस्त्यात तिनं पाठीमागून मारलेली हाक,
आजही...तिच्या आवाजाला तिच धार, मी , खुळा, अवाक!
वाटा कधी वेगळ्याही झाल्या , काळाच्या ओघात ...
पण आठवणींची साठवण राहिली , हळुवार, दोघात!
आजही तिची आठवण येते ...ती येत नाही...
पण केस पिकलेत आताशा मी तेवढसं मनावर घेत नाही !
टिप्पण्या
पण आठवणींची साठवण राहिली , हळुवार, दोघात!
आजही तिची आठवण येते ...ती येत नाही...
पण केस पिकलेत आताशा मी तेवढसं मनावर घेत नाही !
ya chaar oli.......APRATIM..APRATIM..APRATIM